Som Pradosh Vrat: श्रावण सोम प्रदोष व्रत कथा जाणून घ्या

Som Pradosh Vrat: श्रावण सोम प्रदोष व्रत कथा जाणून घ्या

सोमवारी पडणार्‍या प्रदोष व्रतास सोम प्रदोष व्रत म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी भोलेनाथांचा उपवास आणि पूजा करणाऱ्या लोकांची सर्व पापं नष्ट होतात.
Published by :
Team Lokshahi
Published on

हिंदू धर्मात प्रदोष व्रत अत्यंत महत्व आहे. दर महिन्यात दोन प्रदोष व्रत असतात. या दिवशी महादेव आणि देवी पार्वतीची पूजा केली जाते. हिंदू पंचांगानुसार, शुक्ल पक्षाच्या त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत असतो. प्रदोष व्रत सोमवारी येत असल्याने याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. हिंदू धर्मांप्रमाणे सोमवारचा दिवस महादेवाचा दिवस मानला जातो, म्हणून जेव्हा या दिवशी प्रदोष व्रत आल्यास याचं महत्त्वचं अजूनच वाढतं.

प्रदोष व्रत, सोमवार आणि सावन महिना, हे तिन्ही भगवान भोलेनाथांना समर्पित मानले जातात. आज श्रावण महिन्यातील पहिला प्रदोष व्रत, तसेच सोमवार असल्याने त्याचे महत्त्व अधिकच वाढते. यासोबतच आज सर्वार्थ सिद्धी आणि अमृतसिद्धी यांचा योगही तयार होत आहे. अशी श्रद्धा आहे की जो भक्त भगवान शंकराची विधीपूर्वक पूजा करतो आणि या तिथीचे व्रत करतो त्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते.

सोम प्रदोष व्रताची उपासना पद्धत

आज श्रावण महिन्यात येणार्‍या सोम प्रदोष व्रताचे पुण्यपूर्ण फळ मिळण्यासाठी शिव साधकाने सर्वप्रथम स्नान करून ध्यान करावे व या व्रताचा संकल्प करावा. त्यानंतर आपल्या घरी किंवा कोणत्याही शिवालयात जाऊन श्रद्धेने शिवलिंगाला दूध, गंगाजल, फळे व फुले, अक्षत, बेलपत्र, भांग, धतुरा इत्यादी अर्पण करावे. यानंतर दिवसभरात भगवान शंकराचे स्मरण करून त्यांच्या मंत्राचा जप मनात करावा. हे व्रत पाळणाऱ्या व्यक्तीने दिवसा चुकूनही झोपू नये हे लक्षात ठेवा. पंचांगानुसार कोणत्याही दिवसाचा सूर्यास्त आणि रात्रीच्या संधिकालाला प्रदोष म्हणतात, जो शिवपूजनासाठी सर्वोत्तम मानला जातो. अशा स्थितीत आज संध्याकाळी पुन्हा एकदा स्नान करून प्रदोष काळात शिवाची आराधना करून, नियमानुसार रुद्राभिषेक वगैरे करून जास्तीत जास्त लोकांना वाटप करावे.

सोम प्रदोष व्रताचे महत्त्व

अभिषेक, रुद्राभिषेक आणि भोलेनाथ यांच्या साज श्रृगारास सोम प्रदोषच्या दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी खर्‍या मनाने भोलेनाथची उपासना केल्यास अपेक्षित परिणाम मिळतो. मुलगा किंवा मुलगी यांच्या लग्नातील अडथळे दूर होतात. ज्या लोकांना संतती होणं अशी अपोक्षा वा इच्छा आहे त्यांनी या दिवशी पंचगव्यासह महादेवाचा अभिषेक करावा. दुसरीकडे ज्यांना आर्थिक वृद्धी आणि करियरमध्ये यश हवे आहे, त्यांनी दुधाचा अभिषेक केल्यावर शिवलिंगावर फुलांचा हार अर्पण करावा. असा विश्वास आहे की असे केल्याने भोलेनाथ प्रसन्न होतात.

सोम प्रदोष व्रताचे फळ

हिंदू धर्मात भगवान शिवाला कल्याणाची देवता मानले जाते. सावन महिन्यात येणारे प्रदोष व्रत आणि सोमवार पाळल्यास साधकाला भगवान शंकराच्या कृपेने सर्व प्रकारचे सुख व सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की सोम प्रदोष व्रत पाळल्यास साधकाची सर्वात मोठी इच्छा डोळ्याच्या झटक्यात पूर्ण होते आणि त्याच्यावर शिवाचा आशीर्वाद सदैव राहतो.

सोम प्रदोष व्रत पूजा विधी

प्रदोष व्रताच्या दिवशी प्रदोष काळात महादेवाची पूजा केली जाते. सूर्यास्तापासून 45 मिनिटाआधी व सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतर पर्यंतचा काळ प्रदोष काळ मानला जातो. प्रदोष व्रतात महादेवाचं अभिषेक करुन बिल्व पत्र अर्पित करावे. शिव मंत्रांनी जप करावं.

सोमवार प्रदोष कथा

पौराणिक कथेनुसार एका गावात एक ब्राह्मणीचं पतींचं निधन झाल्यामुळे तिला पोटापाण्यासाठी मुलासमवेत भीक मागण्यासाठी घराबाहेर पडावं लागत होतं. ती स्वत: आणि आपल्या मुलाला भीक मागून खाऊ घालायची. दिवस सरत असताना एके दिवस ब्राह्मणी घरी परत येत होती तेव्हा तिला एक मुलगा जखमी अवस्थेत विव्हळत दिसला. ब्राह्मणीने त्याला आपल्या घरी आणले. मुलगा विदर्भाचा राजपुत्र होता. शत्रूच्या सैन्याने त्याच्या राज्यावर हल्ला चढवला होता आणि त्याच्या वडिलांना पकडून आणले होते. त्यांनी राज्याचा ताबा घेतला होता म्हणून तो मुलगा अशा अवस्थेत इकडे-तिकडे फिरत होता.

राजकुमार ब्राह्मणांच्या घरात राहू लागला. मग एके दिवस अंशुमति नावाच्या गंधर्व मुलीने राजकुमारला पाहिले ती त्याला मोहित झाली. दुसर्‍या दिवशी अंशुमति तिच्या आईवडिलांना राजकुमाराला भेटायला घेऊन आली. त्यांना देखील राजपुत्र पसंत पडला. काही दिवसांनंतर भगवान शंकरांनी अंशुमतीच्या आई-वडिलांना स्वप्नात आज्ञा केली की राजकुमार आणि अंशुमतीचे लग्न करावे आणि त्यांनीही तेच केले.

ब्राह्मणी प्रदोष व्रत करत होती. आपल्या मनोभावे उपवासाचा परिणामामुळे आणि गंधर्वराजांच्या सैन्याच्या मदतीने राजकुमाराने विदर्भातून शत्रू पळवून लावले. राजकुमाराने आपल्या वडिलांचे राज्य परत मिळवले. राजकुमारने ब्राह्मण-मुलाला आपल्या राज्याचे प्रधान बनविले.

या प्रकारे ब्राह्मणीच्या प्रदोष व्रताच्या महानतेमुळे राजकुमार आणि ब्राह्मण मुलाला चांगले दिवस आले. अशाच प्रकारे भगवान शंकर त्यांच्या इतर भक्तांवर कृपा करतात. म्हणूनच, सोम प्रदोष यांचे उपवास ठेवणार्‍या सर्व भक्तांनी ही कथा वाचली किंवा ऐकली पाहिजे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com