Jara Jivantika Puja : श्रावणात करतात जरा-जिवंतिका पूजन, जाणून घ्या विधी आणि महत्त्व
Jara Jivantika Puja : श्रावण महिना अनेक सण, प्रथा आणि विधी घेऊन येतो. एकंदरीत आनंदाचा आणि उत्साहाचा श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावणात दर शुक्रवारी जरा-जिवंतिका पूजन केले जाते. दर शुक्रवारी जरा जीविका पूजा करण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने जरा जिवंतिका पूजेचे महत्त्व जाणून घेऊया.
जरा जिवंतिका पूजा पद्धत:
जरा जिवंतिका पूजा महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक शुक्रवारी केली जाते. त्यासाठी अनेक लहान मुलांचे जिवंत चित्र भिंतीवर चिकटवले जाते किंवा अष्टगंधाने काढले जाते. या चित्राची पूजा करा. या पूजेसाठी दुर्वा, फुले, आघाड्याची पाने आवश्यक मानली जातात. या तिघांचा हार बनवून चित्राला घातला जातो. 11 पुरणाचे दिवे करून त्याचा नैवेद्य जिवंतिका पूजे पुढे ठेवला जातो. सोबतच साखर, चणे, फुटाणे याचा नैवद्य दाखवला जातो. त्यानंतर पूजेला आमंत्रित केलेल्या महिलांना हळद आणि कुंकू लावून महाप्रसाद द्यावा.
जरा जिवंतिका पूजेची कथा:
जरा ही मुळात राक्षसी होती. तो मगध देशात राहत होती. मगधच्या एका वृद्ध राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असलेला मुलगा झाला. त्याचा जन्म होताच त्याला शहराबाहेर हाकलून देण्यात आले. त्यावेळी ह्या जरा राक्षसीने ती दोन अवयव एकत्र जुळविली आणि त्या अर्भकाला जीवदान दिले. म्हणून ते बालक ‘जरासंध’ ह्मा नावाने ओळखले जाऊ लागले. पुढे मगध देशात जरा राक्षसीचा महोत्सव केला जाऊ लागला. लोक तिला अनेक मुलांची आई समजू लागले. घरोघरी तिची पूजा होऊ लागली.