Horoscope  राशीभविष्य
Horoscope राशीभविष्य Team Lokshahi

Horoscope राशीभविष्य|'या' राशींना होणार आर्थिक लाभ

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, कोणत्या स्थितीत तुम्हाला लाभ आणि सुख मिळेल, वाचा आजचे तुमचे राशी भविष्य.
Published on

मेष (Aries Horoscope)

नोकरीमध्ये निर्णय अचूकतेमुळे वरिष्ठांची मर्जी संपादन होईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय प्राप्त होऊन कार्यकुशलता वाढेल. उत्तरार्धात राजकारणात तसेच सरकारी कामामध्ये यश मिळेल. नोकरीमध्ये बदलीचे योग. प्रेमप्रकरणात निराशा किंवा तणाव जाणवेल.

वृषभ (Taurus Horoscope)

नवीन वास्तूमध्ये निवेश करण्यास योग्य काळ. सन्तानप्राप्तीसाठी चिंता असल्यामुळे कृत्रिमरीत्या उपाय खर्चिक ठरू शकतात. पराक्रम योग असला तरी प्रेम प्रकरणापासून दूर रहा. सरकारकडून लाभ. नवीन नोकरी योग लाभदायक.

मिथुन (Gemini Horoscope)

सुरुवातीला मिश्रफल मिळतील. तरी, प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारात नवीन संधी आर्थिक लाभ देतील. विदेशी कंपनीतून उत्तरदायित्व प्राप्त होईल. मध्यंतरात उत्साहवर्धक वातवरणाची अनुभूती आली तरी, मनासारख्या गोष्टी नाही घडल्या म्हणून ताणतणाव वाढून देऊ नका

कर्क (Cancer Horoscope)

कामावर एकाग्रता ठेवा. व्यावसायिक प्रगतीमुळे आनंदी राहाल. आजचा दिवस चांगला आहे, यशाचे नवीन मार्ग खुले होतील. तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवका येईल. अति घाई उपयोगाची नाही. मुलांचा हट्ट पुरवावा लागेल.

सिंह (Leo Horoscope)

बौद्धिक क्षमता प्रबळ, पण भाग्य आणि परिश्रमाची सांगड बिघडेल. नोकरीमध्ये बदल, कामाच्या ठिकाणी नवीन कामाच्या संधी उपलब्ध होतील. आत्मविश्वासाची कमी जाणवेल, तब्बेतीची कुरबुर चालू राहिल. जोडीदाराचे स्वास्थ बिघडेल.

Horoscope  राशीभविष्य
Sawan 2022 : 29 दिवसात शिवभक्तांचे बदलेल भाग्य, अर्पण करा या 5 खास गोष्टी

कन्या (Virgo Horoscope)

बुद्धीच्या जोरावर यश आणि अचानक शुभ समाचार मिळतील. कोर्ट-कचेरी आणि महत्वाच्या कामात यश लाभेल. ज्येष्ठ व्यक्तींकडून सहकार्य आणि मार्गदर्शन लाभेल. कामाच्या ठिकाणी वादविवाद असले तरी प्रभाव तुमचाच असेल. प्रेमसंबंध, विवाहयोग घडतील.

तूळ (Libra Horoscope)

विवाह किंवा नवीन प्रेमप्रकरण जुळतील. जोडीदाराबरोबर ताळमेळ जमेल. नोकरीत बदल, बढतीचे योग येतील. नवीन बिझनेस डील घडतील. भागीदारीचे प्रश्न सामोपचारात सोडवा. उत्तरार्ध प्रसन्न असेल. व्यवसायात विशेष धनलाभ घडेल.

वृश्चिक (Scorpio Horoscope)

व्यवसायात गुंतवणूक करताना जोखमीची ठरेल. वाणीवरचा संयम कामाच्या ठिकाणचा मानसिक तणाव दूर करेल. ध्यानधारणा प्रक्षोभक परिस्थिती टाळू शकेल. वडिलांमुळे किंवा मालमत्ता विक्रीमुळे, विदेशाशी जोडलेल्या कामामुळे धनलाभ संभवेल.

मकर (Capricorn Horoscope)

कार्य-व्यापार वृद्धी तसेच कामाची रूपरेखा आखल्याप्रमाणे अंमलबजावणी करता येईल. पैशाची बचत होऊन प्रवासातून लाभ घडतील. कर्ज घेणं टाळा, तसेच जुनी मालमत्ता विकून त्याला योग्य किंमत प्राप्त होईल. प्रेमसंबंध किंवा मनपसंत साथीदाराची ओळख होईल.

Horoscope  राशीभविष्य
Mangal Dosha : लग्नापूर्वी हे काम करा, मंगळाचा प्रभाव होईल दूर

धनु (Sagittarius Horoscope)

वाहन योग नवीन वास्तूखरेदी दर्शवते. वातावरण उत्साहवर्धक, घरी आप्तांच्या भेटीगाठी होऊन आर्थिक प्रश्न सुटतील. उधारी, कर्ज घेणं टाळा. अध्ययन, अध्यात्म यामुळे सकरात्मता वाढवून नोकरी व्यवसायात यश मिळेल.

कुंभ (Aquarius Horoscope)

भागीदारीत आर्थिक लाभ, नोकरीत यश मिळेल. शेअर, सट्ट्यामधे यश मिळेल. नोकरीत बदल, बढतीचे योग. प्रेमप्रकरणात अप्रत्यक्ष लाभ होईल. कौटुंबिक, व्यावसायिक सामंजस्य लाभेल. आईच्या तब्बेतीची विशेष काळजी घ्या.

मीन (Pisces Horoscope)

आरोग्याच्या तक्रारी, अकस्मात खर्च होतील. स्वकर्म आणि आत्मपरीक्षण समाजात प्रतिष्ठा वाढवेल. मानसिक दुबळेपणा, आळस, देखाव्यावर खर्च टाळा. गोपनीय माहितीचा खुलासा मानसिक आणि आर्थिक नुकसानाचं कारण बनेल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com