गणेश चतुर्थीला बाप्पाच्या पूजेत 'या' गोष्टींचा करा नक्की समावेश

गणेश चतुर्थीला बाप्पाच्या पूजेत 'या' गोष्टींचा करा नक्की समावेश

गणेशाची पूजा केल्याने ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. याशिवाय गणपतीच्या काही आवडत्या गोष्टी आहेत ज्यांचा पूजेमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल...
Published on

Ganesh Chaturthi 2023 : भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थी उद्या आहे. चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित आहे. वास्तविक, प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी आहेत. एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात. पण भाद्रपद मासातील शुक्ल चतुर्थी तिथी अतिशय विशेष मानली जाते. या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. गणेश जन्मोत्सव म्हणून हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 10 दिवस चालणारा गणेशोत्सव या दिवसापासून सुरू होतो. चतुर्थी तिथीला गणेशाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी गणेशाची पूजा केल्याने ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते. याशिवाय गणपतीच्या काही आवडत्या गोष्टी आहेत ज्यांचा पूजेमध्ये समावेश करणे आवश्यक आहे. चला जाणून घेऊया त्या गोष्टींबद्दल...

मोदक

गौरीपुत्र श्री गणेशला मोदक आणि लाडू खूप आवडतात. गणपती बाप्पाची पूजा लाडू आणि मोदकाशिवाय अपूर्ण मानली जाते. अशा स्थितीत गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला मोदक आणि लाडू अर्पण करा.

दुर्वा

गणेशाला दुर्वा खूप प्रिय आहे, म्हणून गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वांचा समावेश करा. यामुळे गणपती बाप्पा प्रसन्न होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील.

लाल फूल

गणपतीला लाल फुलेही खूप प्रिय आहेत. त्याशिवाय बाप्पाची पूजा अपूर्ण मानली जाते. अशा वेळी गणेश चतुर्थीला श्री बाप्पाला लाल फुले अर्पण करा. विशेषतः लाल जास्वंदीच्या फुलाला महत्व मानले जाते.

सिंदूर टिळक

श्रीगणेशाला सिंदूर खूप आवडतो. त्याशिवाय विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते, त्यामुळे गणेश चतुर्थीला श्रीगणेशाला सिंदूर टिळक लावा.

केळी

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला केळी अर्पण करा. मात्र, एक गोष्ट लक्षात ठेवा की एक केळी अर्पण करण्याऐवजी जोडीने अर्पण करा.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com