Ganeshotsav : तुम्हाला माहित आहे का गणपतीचे विसर्जन पाण्यातच का केले जाते? जाणून घ्या
गणेशोत्सवात घरोघरी, मोठमोठ्या मंडळात बाप्पाची मनोभावे पूजा केली जाते आणि अनंत चतुर्दशीला म्हणजेच भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला गणपतीचे विसर्जन पाण्यात केलं जाते. मात्र तुम्हाला माहित आहे का? गणपतीचे विसर्जन पाण्यात का केलं जाते?
गणेश चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक घरात गणपतीची स्थापना केली जाते आणि 10 दिवस त्यांची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन केलं जाते.
धार्मिक मान्यतेनुसार आणि पौराणिक कथेनुसार अशी माहिती आहे की, वेद व्यासजी गणपतीला कथा सांगत असत आणि बाप्पा त्या लिहीत असत. कथा सांगताना वेद व्यासजींनी डोळे मिटले. ते सतत 10 दिवस कथा सांगत राहिले आणि बाप्पा लिहून ठेवत राहिले. पण दहा दिवसांनी जेव्हा वेद व्यासजींनी डोळे उघडले तेव्हा त्यांना दिसले की गणपतीच्या शरीराचे तापमान खूप वाढले आहे. त्यांचे शरीर थंड करण्यासाठी, वेद व्यासजींनी गणपतींना पाण्यात ठेवले. त्यामुळे गणपती बाप्पाचे शरीर थंड झाले. अशी मान्यता आहे.
वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही प्रकारचा दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही