दत्त जयंती नेमकी कधी २५ की २६ डिसेंबर? जाणून घ्या योग्य तारीख, वेळ आणि पूजन विधी

दत्त जयंती नेमकी कधी २५ की २६ डिसेंबर? जाणून घ्या योग्य तारीख, वेळ आणि पूजन विधी

मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीचा सोहळा केला जातो. पण, यंदा कॅलेंडरवर दोन दिवस दत्त जयंती लिहिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.
Published on

Datta Jayanti 2023 : मार्गशीर्ष महिन्यातील दत्त जयंतीचा सोहळा केला जातो. पण, यंदा कॅलेंडरवर दोन दिवस दत्त जयंती लिहिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे दत्त जयंती 25 की 26 डिसेंबरला साजरी करायची? असा प्रश्न पडला आहे. परंतु, 26 डिसेंबरला दत्त जयंती साजरी केली जाणार आहे. कारण दत्त गुरूंचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि यंदा पौर्णिमा तिथी 26 डिसेंबर रोजी येत आहे. जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजन विधी...

दत्त जयंती वेळ आणि तारीख

दत्त जयंती ही 26 डिसेंबर रोजी साजरी केली जाईल. या दिवशी पहाटे 5 वाजून 46 मिनिटांनी पौर्णिमेला प्रारंभ होत आहे तर समाप्ती 27 डिसेंबरला सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी होणार आहे. हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस दत्त जयंती असेल. दत्त जयंती निमित्त अनेक मंदिरामध्ये दत्त जन्म साजरा करत भंडार्‍याचेही आयोजन केले जाते. महाराष्ट्रात प्रामुख्याने माहुर, औंदुबर, गाणगापूर, नृसिंहवाडी, कुरवपूर या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

दत्त जयंती कशी साजरी केली जाते?

दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून दत्त मंदिरातमध्ये जाऊन दर्शन घेण्याची प्रथा आहे. तसेच दत्त जयंती दिवशी अनेक भाविक गुरुचरित्र हा दत्त गुरूंच्या कार्यावर बेतलेल्या खास ग्रंथाचं वाचन करतात. मंत्रोच्चारदेखील केले जातात. दत्तजयंतीच्या दिवशी जन्मसोहळ्याच्यावेळी सायंकाळी दत्तजन्माचे कीर्तनही होते. भगवान दत्तात्रेयांची पूजा केल्याने अपूर्ण कामे पूर्ण होतात. संतान प्राप्तीसाठी भगवान दत्तात्रेयांची पूजा करणे देखील शुभ मानले जाते. महर्षी अत्री आणि माता सती अनुसूया यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय यांची पूजा केल्याने त्रिदेवांची कृपा प्राप्त होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com