ज्येष्ठा गौरीचे विसर्जन कसे केले जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त

ज्येष्ठा गौरीचे विसर्जन कसे केले जाते? जाणून घ्या शुभ मुहूर्त

या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती, असे मानले जाते.
Published by :
Team Lokshahi
Published on

ज्येष्ठ गौरीचे महत्त्व

या दिवशी माता गौरी म्हणजे माता पार्वती आणि गणेशाची पूजा केली जाते. गणेश चतुर्थीच्या दोन दिवसांनी माता पार्वती कैलास पर्वतावरून धरतीवर अवतरित झाली होती, असे मानले जाते. गणरायाप्रमाणेच गौरींचेदेखील उत्साहत स्वागत होते. काही जण केवळ मुखवट्यांची पूजा करतात, तर काही जणांकडे उभ्या गौरी असतात. कोकणात काही ठिकाणी खुर्चीवर बसलेली गौरी पाहायला मिळते. तसेच समुद्र किंवा नदीतील खडा आणून पूजण्याची रितही असते. काही ठिकाणी तांब्यावर चेहरा रेखाटून गौरी पूजन केले जाते. प्रत्येक कुटुंबात आपआपल्या पद्धतीनुसार गौरी बसविल्या जातात. मनोभावे गौरींची स्थापना करून त्यांचे पूजन केले जाते. महाराष्ट्रात या सणाला महालक्ष्मी पूजन असेही म्हटले जाते.

ज्येष्ठ गौरी आवाहन २०२३ : शुभ मुहूर्त

ज्येष्ठ गौरी आवाहन गुरुवार, २१ सप्टेंबर २०२३

ज्येष्ठ गौरी आवाहन मुहूर्त – सकाळी ०६:०९ वाजल्यापासून ते दुपारी ३.३५ पर्यंत

ज्येष्ठ गौरी पूजन : शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३

ज्येष्ठ गौरी विसर्जन : शनिवार, २३ सप्टेंबर, २०२३ दुपारी 2 वाजेपर्यंत

अनुराधा नक्षत्र सुरुवात – २० सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ०२:०९ वाजल्यापासून

अनुराधा नक्षत्र समाप्ती – २१ सप्टेंबर २०२३, दुपारी ०३:०३५ वाजेपर्यंत

ज्येष्ठा गौरी विसर्जन पूजा विधी

ज्येष्ठा गौरींचे विसर्जन भाद्रपद शुक्ल नवमी तिथीला केला जाते. यावर्षी ही तिथी 23 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्तावर गौरींची विधीवत पूजा करून आरती केली जाते आणि त्यानंतर मुर्ती हलवून गौरींना निरोप दिला जातो. त्याआधीत घरासमोर रांगोळी काढून हळदी-कुंकवाने गौरींची मार्गस्थ पावले काढली जातात. त्यासाठी हातांच्या छापे काढले जातात आणि गौरीचे विसर्जन केले जाते. काही ठिकाणी गौरींच्या मुर्ती विसर्जित केल्या जातात तर काही ठिकाणी त्याच मूर्ती परंपरागत वापरण्याची प्रथा आहे. राज्यातील विविध भागात हा उत्सव वेगवेगळ्या प्रथा, परंपरा आणि मान्यतांनुसार साजरा केला जातो.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com