अॅडव्हान्स PF मिळवा आता फक्त एका मेसेजवर; काय आहे 'फ्रीडम २०२१' सुविधा? पाहा
आता तुम्हाला PF काढण्यासाठी जास्त मेहनत घ्यायला लागणार नाही आहे. ती कशी तर फक्त एका मेसेजवर तुम्ही तुमचा अॅडव्हान्स PF आता मिळवू शकता. यासाठी तुम्हाला नजिकच्या ईपीएफओ कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल. या नव्या सेवेचं नाव फ्रीडम-२०२१ असं आहे. कोरोनाच्या काळात अनेकांना आर्थिक गरज निर्माण झाली. यासाठीच ही सुविधा उपलब्ध करण्यात आली.
या सेवात तुम्हाला फक्त एका निर्धारित फॉरमॅटमध्ये मेसेज पाठवायचा आहे. याच मेसेजच्या आधारावर पीएफ विड्रॉव्हलची प्रक्रिया सुरू होते. मोबाइलच्या माध्यमातून फक्त एका मेसेजवर तुम्ही तुमचा PF काढू शकता. तुम्हाला फार काही करायचं नाही फक्त रजिस्टर्ज मोबाइल नंबरवरुन एक मेसेज करायचा आहे. इतर सर्व पुढचं काम ईपीएफ कार्यालय करेल.
फ्रीडम २०२१ सेवा
कोईम्बतूरच्या आरओने 'Stay Home Slove All' नावाची मोहीम सुरू केली. हेल्पडेस्कची प्री-बुकिंग सुविधा एसएमएसद्वारे दिली जाते. यामध्ये पीएफ ग्राहकांना व्हॉट्सअॅप क्रमांक देण्यात आले.