गणपती बाप्पाला आवडतं दुर्वा; वाचा सविस्तर...
दुर्वा हे एक पवित्र गवत आहे. जेव्हा श्रीगणेशाच्या दर्शनासाठी या गवताला विशेष महत्त्व असते. 'दुर्वा' हा शब्द 'दुहू' आणि 'अवम्' या शब्दांपासून बनलेला आहे. 'दुहू' म्हणजे दूर असलेला आणि 'अवम' म्हणजे जवळ आणणारा. अशाप्रकारे आपण असं म्हणू शकतो की दुर्वा गवत गणेशभक्तांना त्याच्या जवळ आणते. देवतेला दुर्वा अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा यशस्वी मानली जात नाही. जेव्हा तुम्ही गणेश पूजन करता तेव्हा हे विशेषतः महत्वाचे अर्पण असते.
दुर्वा गवताचे फायदे
दुर्वा गवताची आणखी काही नावे म्हणजे 'डूब', बहामा गवत, बर्मुडा गवत, डेव्हिल्स ग्रास किंवा अगदी क्रॉच ग्रास. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की याच्या तीन चवी आहेत. जसं की गोड, तुरट आणि कडू याप्रकारच्या. हे सर्वोत्तम थंड घटकांपैकी एक आहे. एवढच नव्हे तर हे गवत तुमचे रक्त शुद्ध करताना पित्त आणि कफ दोष देखील कमी करू शकतं. अॅसिडिटीच्या उपचारापासून ते लठ्ठपणापर्यंत आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते हिरड्यांमधून रक्त येण्यापर्यंत दुर्वा गवत हे सर्व करू शकतं.
रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास प्रभावी
त्याचा हायपोग्लाइसेमिक प्रभाव असतो. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि थकवाही कमी व्हायला लागतो. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कडुलिंबाच्या पानांसह दुर्वा घास खाऊ शकता.
वजन कमी करण्यासाठी फायदेशीर
जर तुम्हाला खूप दिवसांपासून वजन कमी करायचे असेल आणि तरीदेखील तुमचं वजन कमी होत नसल्यास दुर्वा घास तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. आयुर्वेदानुसार दुर्वा घास लठ्ठपणावर नियंत्रण ठेवू शकतो. एक चमचा जिरे, 4-5 काळी मिरी आणि थोडी दालचिनी दुर्वा घास मिसळून बारीक करा. आता ते गाळून दिवसातून दोनदा ताक किंवा नारळाच्या पाण्याने प्यावं.