Winter Diet : सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!

Winter Diet : सर्दी आणि व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करा!

ऋतू बदलामुळे सर्दी, व्हायरल इन्फेक्शनसारख्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहेत. जर तुम्हालाही सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शनने ग्रासले असेल तर काळजी करू नका.
Published by :
Pankaj Prabhakar Rane
Published on

ऋतू बदलामुळे सर्दी, व्हायरल इन्फेक्शनसारख्या अनेक आजारांनी डोके वर काढले आहेत. जर तुम्हालाही सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शनने ग्रासले असेल तर काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत जे तुम्हाला व्हायरल इन्फेक्शनपासून वाचवतील.

जर तुम्ही खोकल्याच्या समस्येने त्रस्त असाल तर लिंबू आणि मध गुणकारी आहे. यासाठी एक ग्लास उकळत्या पाण्यात एक लिंबू आणि मध मिसळा आणि रात्री झोपण्यापूर्वी त्याचे सेवन करा. यातून तुम्हाला खूप फायदा होईल.सर्दीच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुळस आणि आले चहामध्ये घालून वापरू शकता. याशिवाय तुम्ही या दोन्हीचे सेवन देखील करू शकता.

सर्दी आणि तापासून बचावासाठी औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली हळद सर्वोत्तम मानली जाते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनची समस्याही दूर होते. यासाठी दोन चमचे हळद पावडर एक ग्लास दुधात मिसळून प्या. याशिवाय तुम्ही हळद पाण्यात उकळून गुळण्या करू शकता किंवा हळदीचे पाणी पिऊ शकता. सर्दी किंवा व्हायरल इन्फेक्शन होऊ नये म्हणून तुम्ही काळी मिरी देखील वापरू शकता. काळी मिरी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम करते. ती सकाळी गरम पाण्यासोबत काळी मिरी खाऊ शकता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com