Tulsi Vivah 2024: यंदा तुळशी विवाह कधी? का केले जाते भगवान विष्णुसोबत तुळशीचे विवाह; जाणून घ्या..
दिवाळी सण हा 4 दिवसांचा असला तरी भाऊबीजच्या काही दिवसांनंतर तुळशी विवाह पार पाडला जातो. आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीच्या काळाला चातुर्मास म्हटलं जातं. यावेळी तुळशी विवाह १३ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पाडला जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूचा तुळशीशी शालिग्राम स्वरूपात विवाह करण्याची ही परंपरा आहे. तुळशी विवाहानंतर लग्नसराईला सुरुवात होते.
धार्मिक मान्यतांनुसार भगवान विष्णू चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर कार्तिकी एकादशीला निद्रावस्थेमधून पुन्हा जागे होतातहिंदू धर्मात कन्यादानाला महादान मानले जाते. अशी मान्यता आहे ज्या घरात शालिग्रामासोबत म्हणजे भगवान विष्णु सोबत तुळशी मातेचा विवाह होतो त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. तुळशीच्या केवळ दर्शनाने हजारो गायी दान केल्याचे पुण्य लाभते तर तुळशीच्या पानाने डोक्यावर शिंपडलेले पाणी हे गंगास्नानाचे पुण्य मिळवते. तर मृत्यूवेळी अंगावर तुळशीपत्र असेल तर व्यक्तीला वैकुंठाचे पुण्य लाभते.
तुळशी विवाह विष्णु सोबत का केले जाते?
धार्मिक कथेनुसार, राक्षसांचा राजा जालंधर याचा विवाह वृंदासोबत झाला होता. वृंदा ही पतिव्रता होती त्यामुळे जालंधर अजिंक्य होता. यामुळे जालंधरचा वध कोणी ही करु शकत नव्हत. यावेळी भगवान विष्णूंनी आपल्या सुबक विचारातून एक योजना आखली आणि जालंधरचे रूप धारण करुन भगवान विष्णु हे वृंदा जवळ गेले आणि पत्नीशी निष्ठा ठेवण्याचे व्रत मोडले त्याच्या दुसऱ्या क्षणालाच जालंधर भगवान शिवाच्या हातून मारला गेला.
मात्र आपल्यासोबत भगवान विष्णु यांनी विश्वास घात केला आणि पवित्रतेचे व्रत मोडून आणि अपवित्र केल्यामुळे वृंदाने प्राण त्यागले. पण त्याआधी तिने भगवान विष्णूला शालिग्राम दगड बनण्याचा शापही दिला. यानंतर ज्याठिकाणी वृंदाने आपले प्राण त्यागले त्याठिकाणी एक तुळशीच्या वनस्पतीचे रोप उगवले आणि भगवान विष्णूने वृंदाला तुळशीच्या वनस्पतीमध्ये रूपांतरित करून लग्न केले आणि तुळशीला दैवत्व प्राप्त झाले.
तुळशी मंत्र
तुळसी श्रीर्महालक्ष्मीर्विद्याविद्या यशस्विनी।
धर्म्या धर्मानना देवी देवीदेवमन: प्रिया।।
लभते सुतरां भक्तिमन्ते विष्णुपदं लभेत्।
तुळसी भूर्महालक्ष्मी: पद्मिनी श्रीर्हरप्रिया।।