दिवाळीच्या सुट्टीत पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्याची भुरळ
पर्यटकांना कोकणातील समुद्रकिनाऱ्याची भुरळ
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पर्यटकांची गर्दी
समुद्रकिनारे पर्यटकांच्या गर्दीने फुलले
कोकणातील समुद्रकिनारी अक्षरशः फुलून गेले आहेत. दिवाळीच्या सुट्टीत आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पाऊले कोकणच्या समुद्रकिनाऱ्याकडे वळत आहेत. समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांचा एंजॉय करण्याचा मूड दिसून येत आहे. गुलाबी थंडीची चाहूल, दिवाळीच्या सलग लागून आलेल्या सुट्ट्याचा मनमुरादपणे आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्रकिनाऱ्याला पसंती दिली आहे. त्यामुळे कोकणातील समुद्रकिनारी चांगले गजबजल्याचे पाहायला मिळत आहे.
कोकणाला पर्यटकांची अधिक पसंती मिळताना पाहायला मिळत आहे. गोव्यानंतर आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पर्यटकांची पसंती मिळू लागली आहे. कोकणातील स्वच्छ सुंदर समुद्र किनारे आणि त्यासोबतच खवय्यांसाठी माशाचं मस्त जेवण पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळे सहाजिकच अलीकडे कोकणात पर्यटकांची संख्या वाढली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात वॉटर स्पोर्ट्स, स्कूबा डायव्हींगचा थरार अनुभवता येतो. स्कूबा डायव्हिंगच्या निमित्ताने महाकाय समुद्रच्या पोटात काय दडलंय हे पाहण्याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. पर्यटकांना कोकणात स्कूबा डायव्हिंग करून पूर्ण करता येते. तारकर्लीच्या समुद्रतील रंगीत मासे, पाण वनस्पती आणि समुद्रातला तळ सारं काही पाहून पर्यटक हरखून जातात. यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक कोकणाकडे आकर्षित होत आहेत.