Kolhapur Vasu Baras 2024: कोल्हापुरात वसुबारस निमित्त गो-मातेची पूजा, दिवाळी उत्सवाची सुरुवात
२८ ऑक्टोबर रोजी अश्विना किंवा कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाचा बारावा दिवस म्हणजे वसु बारस. दिवाळीच्या पहिल्या दिवसासह वसु बारस हा सण साजरा केला जाणार आहे. भारत हा देश कृषिप्रधान असल्याने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. गायीच्या पोटात 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून गायीची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये ज्याप्रकारे इतर सणांना महत्त्व आहे त्याचप्रमाणे दिवाळीतील पहिला दिवस म्हणजे वसुबारस या सणाला देखील महत्त्व आहे.
याचपार्श्वभूमीवर कोल्हापुरात आज शहरासह ग्रामीण भागात नागरिकांकडून गोमातेची विधिवत पूजा केली जात आहे. त्यातचं राज्य सरकारच्या वतीने गोमातेला राज्यमातेचा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वसुबारसला एक विशेष महत्त्व प्राप्त झाल आहे. हिंदू धर्मात गोमातेला अनन्य साधारण महत्व असून गाईला देव मानले जात असल्याने दिवाळीची सुरुवात ही गोमाता पूजनाने केली जाते.
कोल्हापुरातील गोरक्षक संताजी बाबा घोरपडे यांनी घरात गायींच पालन केलय. आज वसुबारस या निमित्ताने गाईंचा गोठा हा फुलांनी सजवलाय तर गाईंच्या पूजेसाठी त्यांच्याकडून परिसरात विविध रंगीबेरंगी रांगोळी काढण्यात आली आहे. चला तर मग पाहुयात कोल्हापुरात कश्या पद्धतीने साजरी केल जात आहे वसुबारस सण.