Kartiki Ekadashi 2024 Pandharpur: सगर दांपत्याला मानाचा वारकरी म्हणून विठ्ठलाच्या महापूजेचा मान

कार्तिकेय एकादशीच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकऱ्याचा मान यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर तालूक्याला मिळाला आहे.
Published by :
Team Lokshahi

कार्तिकेय एकादशी निमित्त आज सर्वत्र आंदमयी वातावरण पाहायला मिळत आहे. या दिवशी तुळशी विवाह देखील पार पाडला जातो. एकादशी म्हटली की डोळ्यासमोर येतं ते एकचं ठिकाण ते म्हणजे पंढरपूर. विठुरायाची नगरी म्हणून ओळखली जाणारी ही पंढरपूरची नगरी कार्तिकेय एकादशी निमित्त वारकऱ्यांनी खुललेली पाहायला मिळत आहे.

यानिमित्ताने वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी गाभाऱ्यात जमलेले पाहायला मिळत आहेत. अशातच कार्तिकेय एकादशीच्या शासकीय महापूजेच्या मानाच्या वारकऱ्याचा मान यंदा लातूर जिल्ह्यातील उदगीर तालूक्याला मिळाला आहे. बाबुराव सगर आणि सागरबाई सगर या वारकरी दांपत्याची निवड करण्यात आलेली आहे. मागील 14 वर्षांपासून ते विठुरायाची पायी वारी करत आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com