Diwali 2024: दिवाळीमध्ये दारासमोर काढल्या जाणाऱ्या रांगोळीचं "हे" आहे महत्त्व; जाणून घ्या...
दिपावली पाडवा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात दिपावली पाडवा आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. भारताच्या वेगवेगळ्या भागात रांगोळी ही प्राचीन सांस्कृतिक परंपरा म्हणून ओळखली जाते. सण, उत्सव, मंगलसमारंभ मुख्य: म्हणजे हिंदू सणांच्या वेळी आणि प्रामुख्याने दिवाळी या सणात घरोघरी रांगोळी ही हमखास काढली जाते.
रांगोळी ही स्त्रीयांच्या हाताची एक सुंदर कला म्हणून देखील ओळखली जाते तसेच आजच्या युगात रांगोळी पुरुषांकडून देखील अतिशय सुरेख पद्धतीने काढली जाते. रांगोळी ही अशुभनिवारक, मंगल्याची सिद्धी तसेच सौंदर्याचा साक्षात्कार म्हणून ओळखली जाते. रांगोळीचा हेतू शक्ती, उदारता जाणवणे हे असून ती सकारात्मकता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठवली जाते.
रांगोळीच्या नक्षीत स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, त्रिशूळ, वज्र, कलश, चक्र अशा प्रतीकांचा समावेश असतो जे प्रतीकात्मक असतात. रांगोळी घरातील आनंद, सकारात्मकता आणि चैतन्य दर्शवते तसेच असे मानले जाते की, रांगोळी नसलेले घर दरिद्राचे निवासस्थान आहे आणि रांगोळी काढलेले घर स्वच्छ प्रवेशद्वार अशी धार्मिक मान्यता आहे.