Diwali 2024: फराळासाठी वापरल्या जाणाऱ्या मसाल्यामध्ये असू शकते भेसळ! अशाप्रकारे ओळखा भेसळ...
दिपावली पाडवा नुकत्याच काही दिवसांवर येऊन ठेपला आह. हिंदू धर्मात दिवाळीला फार महत्त्व आहे तसेच दिवाळी सण अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करताना पाहायला मिळतो. दिवाळीत सर्वत्र प्रकाशमय वातावरण पाहायला मिळते तसेच दाराबाहेर दिव्यांची आरास, रांगोळी तसेच कंदील आणि फटाके फोडले जातात. तसेच दिवाळीत एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे घरी बनवला जाणारा फराळ मग त्यात करंजी, चकली, शंकरपाळी, लाडू आणि अशा अनेक पदार्थांचा समावेश केला जातो.
तसेच दिवाळी सणामध्ये या पदार्थांचा आस्वाद ही आंनदाने घेतला जातो. अनेक जण फराळ विकत आणतात तसेच काही जण फराळ अजून ही घरात तयार करतात. पण सध्या अनेक वेळा अशा बातम्या एकायला मिळत आहेत. ज्यात पदार्थांमध्ये भेसळ झालेल्या पाहायला मिळत आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये तर अनेक गोष्टींमध्ये भेसळ होताना पाहायला मिळते ज्यात मसाले, तूप, पीठ अशा गोष्टी असतात पण हे ओळखायचं कस जाणून घ्या...
दिवाळीसाठी फराळ तयार करत असताना भेसळ ओळखताना लक्षात ठेवा की, भेसळ केलेला मसाला यकृतासाठी तसेच मूत्रपिंडासाठी हानिकारक असतो त्यामुळे किडनी स्टोनची समस्या होण्याची शक्यता आहे. भेसळ केलेला मसाला ओळखण्यासाठी तुम्ही विकत घेतलेला मसाला एका पाण्याच्या ग्लासमध्ये मिक्स करा. जर मसाला भेसल युक्त असेल तर पाण्याचा रंग लाल होईल कारण मसाल्यांमध्ये भेसळ करताना त्यात लाल रंग, विटांचा भुसा, आणि रोडामाइन मिसळले जाते.