Diwali 2024: दिवाळीत दाराबाहेर दिवे लावताय! यावेळी दिव्यांची "या"प्रकारे करा खास सजावट
दिपावली पाडवा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. दिवाळी या सणाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. देशभरात दिपावली पाडवा आनंदाने आणि उत्साहात साजरा केला जातो. अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा प्रतीक म्हणून या सणाला ओळखला जातो. या साणाला घरात फराळ आणि मिठाईचा बेत केला जातो तसेच दारात रांगोळी, कंदील लावले जातात आणि घरात दिव्यांची आरास पाहायाल मिळते. दीप मांगल्याचे प्रतीक मानले जाते अंधार दूर करुन प्रकाश निर्माण करण्यासाठी दिवाळीत दिवे लावले जातात. मात्र हे दिवे लावताना तुम्ही दरवर्षीप्रमाणे साधे दिवेच दारात लावता का? मग यावेळेस काही तरी वेगळ अनुभवा, यावेळी दारात दिव्यांची आरास करण्याआधी त्या दिव्यांना देखील सुंदर असा आकार द्या कसा ते जाणून घ्या...
दिवे सजवण्यासाठी लागणारे साहित्य:
लहान प्लॅस्टिक किंवा लाकडाचे चमचे
सजावटीसाठी लागणारे मोती, मणी, काचा
रंग
पुठ्ठा
दिवा
कापूस
ग्लू-गम
दिवे सजवण्याची कृती:
सर्वात आधी लहान चमचे घ्या त्यांचा खोलगट भाग कापून घ्या आणि त्यांना तुम्हाला हवा तो आवडता रंग द्या. यानंतर एक पुठ्ठा घेऊन त्याला गोल आकारात कापून त्याला सुद्धा चमच्यांना दिलेला रंग द्या. नंतर कापलेल्या चमच्यांचा खोलगट भाग गोल आकारात कापलेल्या पुठ्ठ्यावर चिटकवा मात्र हे चिटकवताना पुठ्ठ्याच्या आतल्या भागापासून गोलाकार करत चिटकवा ते कमळांच्या पाकळ्यांप्रमाणे दिसतील. यानंतर एक दिवा घ्या आणि त्याला देखील चमचे आणि पुठ्ठ्याप्रमाणे तोच रंग द्या. यानंतर तो दिवा त्या पुठ्ठ्यावर चमच्यांच्या मधोमध चिटकवा यानंतर कमळाच्या फुलाप्रमाणे तो दिवा दिसेल. यानंतर त्याला मोती, मणी आणि सजावटीसाठी वापरल्या जाणाऱ्या काचांचा वापर करून सजवा आणि अखेरीस दिव्यात एक छान कापसाची वात तयार करून त्यात तेल ओतून घ्या आणि दिवा पेटवा अशा प्रकारे सुंदर असा दिवाळीसाठी खास दिवा तयार होईल.