Bhaubeej 2024 Wishes: वेड्या बहीणीची वेडी ही माया... भाऊबीजनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा

Bhaubeej 2024 Wishes: वेड्या बहीणीची वेडी ही माया... भाऊबीजनिमित्त आपल्या प्रियजनांना द्या खास शुभेच्छा

यंदा भाऊबीज ही 3 नोव्हेंबंरला आली आहे. भाऊबीजनिमित्त सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा शेअर करा
Published by :
Team Lokshahi
Published on

अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे. भाऊ-बहिणीच्या गोड नात्याला उजाळा देणारा दिवाळीतला सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी भाऊ बहिणीच्या घरी जातो. बहिण भावाला ओवाळते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते. त्यानंतर दोघे एकमेकांना भेटवस्तू देतात. भाऊबीज हा बहिण-भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस. यंदा भाऊबीज ही 3 नोव्हेंबंरला आली आहे. भाऊबीजनिमित्त सोशल मीडियाद्वारे आपल्या प्रियजनांना खास शुभेच्छा शेअर करा.

सोनियाच्या ताटी,

उजळल्या ज्योती,

ओवाळीते भाऊराया रे,

वेड्या बहीणीची वेडीही माया...

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,

भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

दारी रांगोळी सजली,

ज्योतीने पणती सजली,

आली आली दिवाळी आणि भाऊबीज आली,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रेम आणि विश्वासाचे बंधन साजरे करा,

जे काही मागाल ते तुम्हाला नेहमी मिळेल,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

सण बहीण भावाचा आनंदाचा उत्साहाचा,

निखळ मैत्रीचा अतूट विश्वासाचा,

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com