5G Spectrum: 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण, जिओने मारली बाजी

5G Spectrum: 5जी स्पेक्ट्रमच्या लिलावाची प्रक्रिया पूर्ण, जिओने मारली बाजी

देशातील 5 जी स्पेक्ट्रमसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. रिलायन्स जिओने लिलावात 88 हजार 078 कोटी रुपयांची बोली लावली.
Published by :
Team Lokshahi
Published on

देशातील 5 जी स्पेक्ट्रमसाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत रिलायन्स जिओने बाजी मारली आहे. रिलायन्स जिओने लिलावात 88 हजार 078 कोटी रुपयांची बोली लावली. तर, भारती एअरटेलने 43,084 कोटी, व्होडाफोन आयडियाने 18 हजार 799 कोटी रुपयांची बोली लावली. तर, अदानी समूहाने 212 कोटींची बोली लावली. रिलायन्स जिओ देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा देणार असल्याची घोषणा आकाश अंबानी यांनी केली आहे.

रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी यांनी सांगितले की, देशातील सगळ्यात स्वस्त 5 जी इंटरनेट सेवा रिलायन्स जिओ देणार आहे. जागतिक पातळीवरील मानकांनुसार रिलायन्स जिओ 5-जी इंटरनेट सेवा देणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशातील डिजीटल क्रांतीला रिलायन्स जिओ आणखी गती देणार. यासोबतच त्यांनी सांगितले की, शिक्षण, आरोग्य, कृषी, ई-गव्हर्नन्स आदी क्षेत्रात रिलायन्स जिओची 5-जी मदतशीर ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून भारत नवीन आर्थिक महाशक्ती होईल.

रिलायन्स जिओने 5 जी स्पेक्ट्रमसाठी एकूण 88,078 कोटी रुपयांची बोली लावली. रिलायन्स जिओ टेलिकॉमच्या 22 सर्कलमध्ये सर्वाधिक बोली लावणारी कंपनी ठरली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com