सेवानिवृत्तीसाठी उरले फक्त दोन तास; गटविकास अधिकारी अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात
उमाकांत अहीरराव, धुळे | धुळ्यात सेवानिवृत्तीसाठी अवघे दोन तास शिल्लक असताना गटविकास अधिकारी (Group Development Officer) लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात (Anti Corruption Bureau) अडकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक यांच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) ही कारवाई केली आहे.
शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी (Group Development Officer) वाय. डी. शिंदे आज (31 मार्च) सेवानिवृत्त होणार होते. याबाबत आज सेवानिवृत्तीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या पत्रीकांचे देखील वाटप करण्यात आले होते. परंतु, सेवानिवृत्तीच्या दोन तास आधीच त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Corruption Bureau) शिताफीने ताब्यात घेतले. गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांच्या सांगण्यावरून सहाय्यक लेखा अधिकारी चुनीलाल देवरे या कर्मचाऱ्याला पाच हजारांची लाच घेताना लाचलुचपतच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे.
या प्रकरणातील अर्जदार हे जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षक आहेत. त्यांच्या तक्रारीवरुन आज लाचलुचपत विभागाने (Anti Corruption Bureau) ही कारवाई केली आहे. तक्रारदार यांची पीएफ कर्जाची फाईल पुढे पाठविण्यासाठी वाड. डी. शिंदे यांनी तक्रारदार यांच्याकडे लाचेची मागणी केली होती. याबाबत त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागकडे (Anti Corruption Bureau) तक्रार केली. तक्रारीची खातरजमा करून लाचलुचपतच्या धुळे पथकानेने शिरपूर पंचायत समितीच्या आवारात सापळा रचून दोघांवर कारवाई केली.