International
ख्रिस्तियानो रोनाल्डोची एका कृतीने, कोका-कोला कंपनीचे मोठे नुकसान
युरो चषक २०२० मध्ये सामन्यापूर्वी रोनाल्डोने पत्रकार परिषदेत कोका कोलाच्या बाटल्यांना बाजूला करत पाण्याची बॉटल वर केल्याने कोका कोला कंपनीला तब्बल ४ बिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांनुसार सुमारे 29 हजार कोटींचं नुकसान झालं आहे. मंगळवारी हंगेरीविरुद्धच्या सामन्या दरम्यान रोनाल्डो पत्रकार परिषदेला उपस्थित होता.
त्यावेळी त्याच्या समोर भरलेल्या कोका कोलाच्या बाटल्या ठेवण्यात आल्या होत्या. रोनाल्डोने या बाटल्या बाजूला केल्या आणि तिथे असलेली पाण्याची बॉटल उचलत प्रेक्षकांकडे दाखवत पाणी असं म्हणाला. या कृतीतून रोनाल्डोने कोका कोलासारख्या पेयांपेक्षा पाणीच सरस असल्याचं दाखवलं. त्याच्या याकृतीमुळे कोका कोला कंपनीला काही तासांच्या आतच 29 हजार कोटींचं नुकसान झालं.