ऑलिम्पिकमधील खेळाडू लाल किल्ल्यावर; पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

ऑलिम्पिकमधील खेळाडू लाल किल्ल्यावर; पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार

Published by :
Published on

भारताने टोक्यो ऑलिम्पिकमध्ये जरी आतापर्यंत 3 पदकं जिंकली असली तरीही आपल्या खेळाच्या प्रदर्शनाने पूर्ण देशाला प्रभावित केलं आहे.म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
१५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनानिमित्त संपूर्ण ऑलिम्पिक संघाला विशेष पाहुणे म्हणून लाल किल्ल्यावर आमंत्रित केलं आहे.

या कार्यक्रमामध्ये ऑल्मिपिक स्पर्धेत भारतीयांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या १२७ खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये भारताला तीन पदकं निश्चित झाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकवलेलं रौप्य पदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने कांस्यपदक पटकावलं असून भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने आपलं पदक शुक्रवारी झालेल्या सामन्यामधील विजयाने निश्चित केलं आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच भारत देशाने तीन पदके मिळवली.म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक करणारे ट्वीट केले."भारत ऑगस्ट महिन्यात प्रवेश करत असून अमृत मोहोत्सवाची सुरुवात झाली आहे. प्रत्येक भारतीयाला मनाला स्पर्श करणाऱ्या घटना घडत आहेत. विक्रमी लसीकरणाबरोबरच सर्वाधिक जीएसटी संकलनातून अर्थव्यवस्थेला चालना मिळत असल्याचे संकेत दिसत आहेत" असं मोदी पहिल्या ट्विटमध्ये म्हणालेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com