Uncategorized
दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती.. शास्त्रज्ञांचा धक्कादायक दावा
जवळपास महिन्याभरापूर्वी म्हणजेच १३ मे रोजी केंद्रीय आरोग्य विभागाकडून कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधलं अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेकांचे दुसरे डोस लांबवणीवर पडले. काहींनी यावर आक्षेप नोंदवला. मात्र शास्त्रज्ञांच्या सल्ल्यानेच हा निर्णय घेतल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले होते.
दरम्यान, मंगळवारी याच गटाच्या काही वैज्ञानिकांनी दोन डोसमधलं अंतर १२ ते १६ आठवडे करण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती, केंद्रानं त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतल्याचा दावा केला आणि खळबळ उडाली. लागलीच आज सकाळी NTAGI चे प्रमुख एन. के. अरोरा यांनी एएनआयशी बोलताना यावर खुलासा केला आहे.
अंतर वाढवण्यावर गटामध्ये कोणतीही मतभिन्नता नव्हती, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या निर्णयावरून आता नवा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.