आता विमानतळावर RT-PCR चाचणी बंद
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे आजपासून राज्य सरकारने लॉकडाऊनचे नियम शिथिल केलेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर होणाऱ्या RT-PCR चाचणीमधून प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने आंतरराष्ट्रीय विमानतळावरील RT-PCR चाचणी करण्याचा नियम शिथिल करून या पुढे प्रवाशांना ही चाचणी करणे बंधनकारक नाही. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
सोमवारी राज्यामध्ये १५ हजार करोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात कोरोना रूग्णांचा आलेख हळूहळू खाली येत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना RT-PCR चाचणी करणे बंधनकारक होते. परंतु आता ही चाचणी प्रवाशांना करणे बंधनकारक नसून त्यासाठी जबरदस्ती करू नये, अशा सूचना मुंबई महापालिकेने दिल्या आहेत.