आता ATM मधून पैसे काढणं होणार महाग

आता ATM मधून पैसे काढणं होणार महाग

Published by :
Published on

उद्यापासून RBI चे नवीन नियम लागू होणार आहेत. आता पासून प्रत्येक 5 व्या ट्रान्जेक्शनसाठी 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. RBI ने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे.

त्याचप्रमाणे नॉन फायनान्शियल ट्रान्जेक्शनसाठी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये केली आहे. एटीएममधून पैसे काढणं आपल्या नित्याची बाब असून आता डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पैसे काढणे महाग होणार आहे. आरबीआयने नवीन नियम लागू केले असून उद्यापासून (1 ऑगस्ट) एटीएममधून रोकड काढणं महाग होणार आहे.

आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक देवघेवींवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक म्हणजे नॉन फायनान्शियल ट्रान्जेक्शनसाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे.

आयसीआयसीआय बँकेचा विचार करता या बॅकेंच्या महिन्यातील पहिल्या चार ट्रान्जेक्शनवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाहीत तर पाचव्या ट्रान्जेक्शनसाठी तब्बल 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com