आता 10 लाख लोकांना मिळू शकते नोकरी! कारण…

आता 10 लाख लोकांना मिळू शकते नोकरी! कारण…

Published by :
Published on

भारतात ५ जी नेटवर्कला तीन महिन्यात काही लिमिटेड जागी लाँच केले जाऊ शकते. कारण, ऑप्टिकल फायबर आधारित इंफ्रास्टक्चर आता पूर्णपणे तयार आहे. नोकिया इंडियाचे मार्केटिंग आणि कॉर्पोरेट चे प्रमुख अमित मारवाह यांनी म्हटले की, भारतात ५ जी सर्विसला लाँच करण्याचा निर्णय करावा लागणार आहे. अन्यथा नेक्स्ट जनरेशनची टेक्नोलॉजीचा लाभ घेऊ शकणार नाहीत. तसेच टेलिकॉम हार्टवेयर मध्ये पीएलआय सोबत मिळून हा अंदाज लावला जाऊ शकतो की, भारतात १० लाख नोकरी निर्माण केले जातील.

आपण ५ जी लवकरात लवकरच इनेबल केले नाही तर आपण ही संधी गमावू शकतो. ५जी ऑपरेटरांसाठी पैसा बनवण्याचे कोणतेही साधन नाही. भारत आणि जगात नवीन आर्थिक मूल्य बनवण्याची ही वेळ आहे. आम्ही भारतात ५ जीचे निर्माण करीत आहोत. यासाठी हार्डवेयर सुद्धा तयार आहे. त्यामुळे आम्ही भारतात पुढील ३ महिन्यात ५ जी नेटवर्कला डिप्लॉय करण्यासाठी काम करू शकतो. नोकिया चेन्नई प्लांटमधून जगाच्या अन्य भागात ५जी उपकरणला एक्सपोर्ट करीत आहे. याच्या भागीदारीसाठी प्रोडक्शन लिंक्ड इंसेटिव योजना बनवत आहे असे अमित मारवाह यांनी सांगितले.

टेलिकॉम एक्सपर्ट प्रमोशन काउंसिलचे चेयरमन संदीप अग्रवाल यांनी लोकल स्तरावर मॅन्यूफॅक्चर होणारे गियर्सचा वापर करण्यास सांगितले आहे. तसेच सुरक्षेसाठी नियंत्रण भारताकडे असायला हवा. ५जी सर्विसेजचे समर्थन करण्यासाठी ऑप्टिकल फायबर बेस इन्फ्रास्ट्रक्चर केवळ काही निवडक क्षेत्रात उपलब्ध आहे. त्यामुळे या टेक्नोलॉजीला काही निवडक क्षेत्रात रोलआउट केले जाऊ शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com