Raosaheb Danve
Raosaheb Danve

रावसाहेब दानवेंचा समाचार घेऊ इच्छिणाऱ्या करण गायकरांना पोलिसांकडून नोटीस

Published by :
Vikrant Shinde
Published on

मागील काही दिवसांपासुन संपूर्ण राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नावावर राजकारण सुरू आहे. छत्रपती शिवरायांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांची संख्याही राज्यात चांगलीच बळावताना दिसते आहे.

मागील काही दिवसांपुर्वी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याला पाठिंबा देणारे विधान केले होते. ह्या विधानानंतर संपूर्ण राज्यभरातून ह्या विधानाचा निषेध नोंदवला जात आहे.

छावा क्रांतिवीर सेनेकडून तर रावसाहेब दानवेंना 'नाशिकमध्ये पाय ठेवून दाखवा' असा थेट इशाराच दिला होता. दरम्यान, उद्या (13-03-2022) रावसाहेब दानवे नाशिकमध्ये पोहोचणार आहेत. ह्या पार्श्वभुमीवर छावा क्रांतिवीर सेनेकडून रावसाहेब दानवेंचा समाचार घेण्यासाठी तयारी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळताच छावा क्रांतिवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर ह्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आली आहे.

करण गायकर ह्यांना पोलिसांनी पाठवलेली नोटीस

यानुसार, 'केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे महापालिकेच्या (NMC) विविध प्रकाल्पांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी (project inauguration) नाशकात आल्यानंतर त्यांच्या दौऱ्यादरम्यान आपण किंवा आपल्या कार्यकर्त्यांच्याकडून आंदोलन (Agitation), निदर्शने किंवा आक्षेपार्ह घोषणाबाजी किंवा अवैधानिक कृत्य करू नये. जर आपण किंवा आपले कार्यकर्ते असे काही करताना आढळून आले तर आपण व आपल्या कार्यकर्त्यांना सर्वस्वी जबाबदार ठरवून आपल्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी तंबी देण्यात आली आहे.'

तर ह्या नोटीसवर 'चुकीची वक्तव्य मंत्र्यांनी करायची आणि नोटीस मात्र आम्हाला द्यायची हे योग्य नाही. नोटीस द्यायचीच असेल तर ती रावसाहेब दानवेंना द्या' अशी प्रतिक्रीया करण गायकर ह्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com