‘निवडणूक लढण्यास पैसे नाहीत, पण उत्तराखंडचे मुख्यमंत्री व्हायला तयार’

‘निवडणूक लढण्यास पैसे नाहीत, पण उत्तराखंडचे मुख्यमंत्री व्हायला तयार’

Published by :
Published on

2022 च्या विधानसभा निवडणुकीत पक्ष सत्तेवर आल्यास तेही सरकारचे नेतृत्व करण्यास तयार असतील, असे सूचक मत काँग्रेसचे सरचिटणीस आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केले आहे. द प्रिंटला दिलेल्या मुलाखतीत रावत यांनी हे वक्तव्य केले.

उत्तराखंडातील आगामी निवडणुकीवर बोलताना हरिश रावत यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण असेल यावर भाष्य करण्यास नकार दिला. जर उत्तराखंडच्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या बाजूने मत दिल्यास मी शासनप्रमुख म्हणून जबाबदारी घ्यायला मागे हटणार नाही आणि तसे पक्षालाही अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

'निधीची टंचाई' असल्याने ते विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते, कारण ते मुख्यमंत्री असताना ज्यांनी त्यांच्यासाठी वित्तपुरवठा केला त्यांनी त्यांना सोडले होते. रावत, जे ऑक्टोबरपर्यंत पंजाबचे काँग्रेसचे प्रभारी होते, त्यांनी देखील कॅप्टन अमरिंदर सिंग यांना त्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवण्याचे समर्थन केले आणि ते "भाजप-अकाली दल एजंट" सारखे काम करत असल्याचा आरोप केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com