student suicide|ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नाही, विद्यार्थिनीची आत्महत्या
२०२० भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला आणि शाळा,महाविद्यालयासोबत संपुर्ण भारत बंद होता. त्यामुळे शिक्षणाचा मोठा प्रश्न उपस्थित राहीला.शिक्षण खंडीत होऊ नये म्हणून सरकाने ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग निवडला. पण भारत पुर्ण प्रगत देश नसून आजही प्रगतीपथावर आहे त्यामुळे देशात तंत्रज्ञानाचा विकास तेवढा झालेला नसल्याने विद्यार्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
ग्रामीण भागात मोबाईलला नेटवर्क नसल्याने एका विद्यार्थीनीने डोंगरात तंबू ठोकून ऑनलाईन शिक्षण घेत होती.मुळात ते राज्यात असलेला तंत्रज्ञानाच्या अभावाचे प्रदर्शन होते. यातून प्रशासनाने धडा घेत काही नगरपालिकेच्या शाळांनी इंटरनेट विद्यार्थ्यांना मोफत दिला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आजही नेटवर्क असले तरी विद्यार्थ्यांना मोबाईल घ्यावे इतके पैसेही पालकांकडे नाही.
अशीच घटना नांदेड जिल्ह्यातील नायगाव शहरात घडली. दहावीला ७५ टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थीनीने बारावीच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल नसल्याने आत्महत्या केली. आई-वडीलांकडे अट्टाहास करुनही परिस्थिती नसल्याने मोबाईल घेतला नाही.कोरोनामुळे शाळा बंद असल्याने, सरकार आणि शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचा पर्याय निवडला. पण या ऑनलाईन शिक्षणाचा गावांमध्ये काहीही फायदा होत नाही. खेड्य़ांमध्ये सुविधा नाही. याचा विचार होणं गरजेचं होतं. पण तसं झालं नाही.
त्यातच खेड्यापाड्यात आधीच आर्थिक स्थिती हलाखीची असते. मोलमजुरी करुन हातावर पोट भरणाऱ्या कुटुंबात स्मार्टफोन इंटरनेट या सर्व गोष्टी फार दुर्मिळ असतात. एकीकडे बिकट आर्थिक परिस्थिती तर दुसरीकडे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती यामुळे बरेच विद्यार्थी आत्महत्या करत आहे. त्यामुळे यावर सरकारने लवकरात लवकर उपाययोजनाची करण्याची गरज आहे.