जीएसटी बैठक; औषधांवर जीएसटी नसणार- अर्थमंत्री निर्मला सितारमण

जीएसटी बैठक; औषधांवर जीएसटी नसणार- अर्थमंत्री निर्मला सितारमण

Published by :
Published on

कोरोना व्यतिरिक्त महाग जीवनरक्षक औषधं आहेत, त्या औषधांवर जीएसटी नसेल असं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं आहे. सितारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४५ वी मॅरेथॉन जीएसटी बैठक पार पडली. या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी पत्रकारांना बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मोफत आयात केली जाणारी श्वसनयंत्रे, प्राणवायू विलगीकरण यंत्रांसारखी साह्यभूत सामग्री तसेच, म्युकरमायकोसिसवरील 'अ‍ॅम्फोटेरीसिन-बी'ची कुपीही वस्तू व सेवा करातून (जीएसटी) वगळण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. ही सवलत ३१ डिसेंबरपर्यंत लागू असेल, अशी घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली.

पेट्रोल डिझेल जीएसटीत नाही

राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलला जीएसटीच्या चौकटीत आणण्यास विरोध केला. त्यामुळे पेट्रोलियम उत्पादनं जीएसटीच्या चौकटीत आणण्याची ही योग्य वेळ नाही, असं अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं."पेट्रोल डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याबाबत चर्चा झाली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com