संतोष परब हल्ला प्रकरण; नितेश राणेंची अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

संतोष परब हल्ला प्रकरण; नितेश राणेंची अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

Published by :
Published on

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली (Kankavali) येथील शिवसैनिक संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली आहे. या प्रकरणी आता आज (२७ जानेवारी) सुनावणी होणार आहे. यापूर्वी हायकोर्टानं त्यांचा जामीन फेटाळला होता.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक प्रकरणी राजकीय संघर्षातून शिवसैनिक संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. हा हल्ल्यामागे आमदार नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप परब यांनी केला होता. याप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात आपल्याला अटक होऊ नये म्हणून सुरुवातीला नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर त्यांनी हायकोर्टातही धाव घेतली पण दोन्हीकडे नितेश राणे यांना दिलासा मिळाला नाही. पण पुढच्या सुनावणीपर्यंत त्यांना अटक करु नये असंही हायकोर्टानं म्हटलं होतं. त्यामुळं राणेंना काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com