Konkan
नितेश राणेंची मध्यरात्रीपासून बिघडली तब्येत, उलट्यांचा त्रास झाला सुरु
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने उद्या(बुधवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नितेश राणेंच्या जामीनावर निकाल देणार असल्याचे सांगितले.
नितेश राणेंना सुरुवातीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडीत असताना तब्येत बिघडल्यामुळे कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता पुन्हा आमदार नितेश राणे यांची प्रकृती बिघडली असून त्यांना मध्यरात्रीपासून उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यात येत आहेत.