Nitesh Rane : नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सुनावणी
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होती. परंतु दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने उद्या(बुधवार) सकाळी ११ वाजताच्या दरम्यान नितेश राणेंच्या जामीनावर निकाल देणार असल्याचे सांगितले.
सरकारी वकील ऍड. प्रदीप घरत आणि भुषण साळवी हे कामकाज पाहत आहेत. तर नितेश राणेंच्या बाजूने वकील संग्राम देसाई आणि सतीश मानेशिंदे हे बाजू मांडत आहेत.
तपासादरम्यान काही आर्थिक व्यवहार दृष्टीपातळास आलेले आहेत. ते आम्ही तपास पूर्ण झाल्यानंतर जाहीर करणार आहोत. तसेच राणेंना जामीन मिळणार की नामंजूर होणार, असे प्रदीप घरत यांनी सांगितले.
नितेश राणेंना सुरुवातीला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. यानंतर त्यांना १८ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कोठडीत असताना तब्येत बिघडल्यामुळे कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.