Share Market: Sensex 2,702 अंकांनी कोसळला तर Nifty 16,248 पर्यंत गडगडला
रशियाने युक्रेनवर लष्करी कारवाई सुरू करताच त्याचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर मार्केटवर झाल्याचं पहायला मिळत आहे. शेअर बाजार मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तसेच शेअर बाजारात 23 मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण झाली आहे.
आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 2,702.15 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 815.30 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 4.72 टक्क्यांची घसरण होऊन तो 54,529.91 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 4.78 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,248 वर पोहोचला आहे.
आज केवळ 240 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 3084 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 69 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. निफ्टीमधील सर्वच क्षेत्रामध्ये 3 ते 8 टक्क्यांची तर BSE मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये 5 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे.
शेअर बाजारामध्ये आज झालेली घसरण ही 23 मार्च 2020 नंतरची सर्वात मोठी घसरण आहे. प्राथमिक अंदाजानुसार, भारतीय शेअर बाजारात आजा गुंतवणूकदारांचे जवळपास 10 लाख कोटी रुपये पाण्यात गेले आहेत.