Vaibhav Naik: स्वातंत्र्यदिनीही झेडपीच्या विद्यार्थ्यांना नवा गणवेश नाहीच; वैभव नाईकांची सरकारवर टीका
राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्याचे धोरण जाहीर केले होते. यापूर्वी शालेय गणवेश त्या-त्या जिल्ह्यातील खरेदी करण्याचे अधिकार त्या-त्या शिक्षण कमिटीकडे दिले होते. मात्र, यावर्षी शासनाने संपूर्णपणे एकत्रित गणवेश खरेदी करण्याचे धोरण निश्चित केलं.
याबाबत विधानसभेमध्ये सुद्धा यावर चर्चा झाली. हे गणवेश विद्यार्थ्यांना लवकर मिळावे. त्याची क्वालिटी चांगली असणे गरजेचे आहे. परंतु, मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांनी हे गणवेश 15 ऑगस्टपूर्वी सर्व शाळांना पोहोचतील असं सांगितलं होतं. मात्र, आता शाळा सुरू होऊन जवळपास तिसरा महिना सुरू झाला आहे.
एकीकडे हर घर घर तिरंगा म्हणायचं आणि मुलांना जुन्या गणवेशातच शाळेत जायला शासन प्रवृत्त करत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उदाहरण घेतलं असता 1350 शाळांपैकी 63 फक्त शाळांना गणवेश वाटप करण्यात आलेत. अजूनही 31 हजार 871 विद्यार्थ्यांपैकी 29 हजार 516 विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी 15 ऑगस्ट कसा साजरा करायचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्यामुळे आम्ही या शासनाचा धिक्कार करीत आहोत.