sharad Pawar
sharad PawarTeam Lokshahi

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर यंत्रणा सतर्क, शरद पवारांना Z+ सुरक्षा देण्याचा निर्णय?

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या हत्येनंतर आता केंद्रीय यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रीय यंत्रनेने राज्यातील आढावा घेतला आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रनेने खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांची मुंबईत हत्या झाली. या हत्येनंतर आता केंद्रीय यंत्रणा सज्ज झाली आहे. केंद्रीय यंत्रनेने राज्यातील आढावा घेतला आहे. यानंतर आता केंद्रीय यंत्रनेने खासदार शरद पवार यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, आता केंद्रीय यंत्रणा खासदार शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी संपर्क साधणार आहे. याआधीही केंद्राने खासदार शरद पवार यांना झेडप्लस सुरक्षा दिली होती, पण ती सुरक्षा पवार यांनी नाकारली.

काही दिवसापूर्वी खासदार शरद पवार यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. पण पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. शरद पवार यांच्या सुरक्षेसाठी ५५ सशस्त्र सीआरपीएफ जवानांची तुकडी तैनात करण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला होता. मात्र आता ही सुरक्षा घेण्यास शरद पवार यांनी नकार दिला होता.

सुरक्षा दलाचे वाहन घेण्यासही पवारांनी नकार दिला होता. सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार यांनी यावर आश्चर्य व्यक्त केले होते. १५ सीआरपीएफ आणि दिल्ली पोलिस अधिकाऱ्यांनी शरद पवार यांच्याशी सुरक्षेबाबत चर्चा केली होती. मात्र पवार यांनी सुरक्षा नाकारली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आग्रह करणार असल्याचे बोलले जात आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com