पंतप्रधान मोदींना तुम्हीही देऊ शकता वाढदिवसाच्या शुभेच्छा; कसं ते जाणून घ्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आपला 73 वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्त भाजपकडून नमो अॅपवर 'सेवा पखवाडा' अभियान सुरु करण्यात आले आहे. भारतीय नागरिक या अभियानात सहभागी होऊ शकतात आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा थेट देऊ शकतात.
यासाठी तुम्हाला नमो अॅप डाऊनलोड करावे लागेल. यात मोबाईल क्रमांक किंवा ईमेलआयडीच्या माध्यमातून तुम्ही रेजिस्ट्रेशन करु शकता. त्यानंतर सेवा पखवाडा या बॅनरवर क्लिक करा. सेवा पखवाडा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही पर्याय दिसतील. यात व्हर्च्युअल एक्झिबिशन कॉर्नर, व्हिडिओ शुभकामना, फॅमिली ई-कार्ड सेवा, प्रगती पथ पर भारत आणि भारत सपोर्ट मोदी या अॅक्टविटिजचा समावेश आहे.
व्हर्च्युअल एक्झिबिशन कॉर्नर
तयार केलेले व्हिडिओ पाहण्यासाठी 'युवा नमो'वर क्लिक करा
तुमच्या स्वत:चा व्हिडिओ तयार करण्यासाठी 'पीएम स्टोरी'वर क्लिक करा
पाच ते दहा फोटो निवडा आणि क्रियेट स्टोरी म्हणा
व्हिडिओ शुभकामना टू मोदी
सेवा पखवाडा होमपेजवरुन व्हिडिओ शुभकामनावर क्लिक करा
अपलोड व्हिडिओवर क्लिक करुन तुमचा व्हिडिओ अपलोड करा
शुभेच्छा देण्याची कॅटेगरी निवडा आणि व्हिडिओ पोस्ट करा
नागरिक व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करु शकतात
फॅमिली ईकार्ड टू मोदी
फॅमिली ई कार्ड बॅनरवर क्लिक करा
त्यानंतर क्रियेट फॅमिली कार्डवर क्लिक करा
तुमच्या आवडीचे टेम्पेट निवडा
तुमच्या कुटुंबियांची नावे टाका आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा संदेश लिहा आणि नेक्स्टवर क्लिक करा
ईकार्ड व्हिडिओ तुम्ही विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करु शकता
प्रगती पथ पर भारत
हमे चलते जाना है सेक्शनमध्ये तुम्हाला पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात विकास पावत असलेल्या स्थळांची निवड करावी लागेल, त्यानंतर तुम्ही ते सोशल मीडियावर शेअर करु शकतात.
भारत सपोर्ट मोदी
हमे चलते जाना है सेक्शनवर क्लिक करा
येथे मॅप दिसेल, ज्यात लोक कोठे सेवा देत आहेत ते दिसेल
टायटलवर क्लिक करुन मॅपवरील फोटो तुम्ही पाहू शकता
फोटो शेअर करा आणि इतर लोकांनाही सेवा करण्यास प्रोत्साहन देऊ शकता
हे अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोंबर म्हणजे महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सुरु असणार आहे.