yes bank
yes bankTeam Lokshahi

YES BANK : आता वेळेआधी एफडी तोडल्यास लागेल दुप्पट दंड, कारण...

8 ऑगस्ट 2022 पासून नवीन नियम लागू होणार असुन मुदतीपूर्वी एफडी खंडित झाल्यास गुंतवणूकदारांना दंड म्हणून जास्त रक्कम भरावी लागेल.
Published by :
Shubham Tate
Published on

YES BANK : येस बँक (YES BANK) ने मुदत ठेव म्हणजेच FD ला लागू होणारे नियम आता कडक केले आहेत. आता बँकेच्या ग्राहकांना लॉक-इन कालावधीपूर्वी एफडी तोडल्यास जास्त दंड भरावा लागणार आहे. तसेच येस बँकेच्या वेबसाइटनुसार, आता प्रत्येक मुदतीच्या एफडीसाठी मुदतपूर्व पैसे काढण्याचा दर भिन्न आहे. 8 ऑगस्ट 2022 पासून नवीन नियम लागू होणार असुन मुदतीपूर्वी एफडी खंडित झाल्यास गुंतवणूकदारांना दंड म्हणून जास्त रक्कम भरावी लागेल. तसेच दंडाची रक्कम एफडीच्या कालावधीवर आधारित असेल.(yes bank update double penalty on breaking yes bank fd before time)

yes bank
GST : तुमचा खिसा आणखी रिकामा होणार, सोमवारपासून 'या' वस्तू होणार महाग

येस बँक बँकेच्या मते, 181 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या FD वर मुदतीपूर्वी पैसे काढल्यास दुप्पट दंड आकारला जाईल. यावर बँकेने दंडाची रक्कम 0.25% वरून 0.50% केली आहे. त्याचप्रमाणे, 182 दिवस किंवा त्याहून अधिक कालावधीची FD वेळेपूर्वी तोडल्यास आता 0.75 टक्के दंड आकारला जाईल, जो पूर्वी 0.50 टक्के होता. मात्र, हा नियम ज्येष्ठ नागरिकांना लागू होणार नाही.

बँकेने 'एवढे' वाढवले व्याजदर

18 जून रोजी येस बँकेने एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती. या अंतर्गत, बँक आता सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या कालावधीच्या FD वर 3.25% ते 6.50% पर्यंत व्याज देते, तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.75% ते 7.25% व्याज देते. यामध्ये 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीच्या FDचा समावेश आहे. 18 महिने ते 10 वर्षे मुदतीच्या 2 कोटींपेक्षा कमी एफडीवर, बँक सामान्य नागरिकांना 6.5 आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 7 ते 7.25% एफडी ऑफर करते.

बँक कर्मचाऱ्यांना सवलत

येस बँकेने एफडीवर लावलेला दंड सर्व ग्राहकांसाठी सामान्य आहे. मात्र यामध्ये बँक कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांनी 5 जुलै 2019 ते 9 मे 2021 या कालावधीत FD मिळवली आहे, त्यांना FD मुदतीपूर्वी तोडण्यासाठी आणि काढण्यासाठी नवीन प्रणालीनुसार दंड भरावा लागेल. 10 मे 2021 नंतर FD करणाऱ्यांना मुदतीपूर्वी पैसे काढण्यासाठी कोणताही दंड भरावा लागणार नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com