पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांची टीका

पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांची टीका

पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न; यशोमती ठाकूर यांची टीका
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

 स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती महाराष्ट्र सदनात साजरी करत असताना सावित्रीबाई फुले व अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवल्याने काँग्रेस नेत्या व आमदार यशोमती ठाकूर यांनी संतप्त प्रतिक्रिया देत भाजपाचा निषेध केला.

भाजपाला पुरोगामी विचारांना मारून टाकायचं आहे, ते पुरोगामी विचारांना मारून टाकण्याचा प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे लोकशाहीच्या मंदिराचा उद्घाटन करत असताना दिल्लीतील आंदोलन मोडून टाकत आहे. याचा मी निषेध करते अशी प्रतिक्रिया यशोमती ठाकूर यांनी दिली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com