Yamini Jadhav : निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत, या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारच
लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आज लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. देशातील 8 राज्यांतील 49 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. शिवसेनेने मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातून यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. यामिनी जाधव यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
यामिनी जाधव म्हणाल्या की, निस्वार्थी भावनेनं लोकांची सेवा करण्यासाठी या क्षेत्रात आलेलो आहोत. या निस्वार्थी भावनेनं पुढेही सेवा करण्यासाठी मी खासदार होणारचं. हे देवाला सांगून आले. जास्तवेळ प्रचार करुन काही फायदा नसतो.
लोकांचा मनात त्यांचा उमेदवार ठरलेला असतो. त्यांनी एकदा जरी चेहरा दाखवला. त्यांनी आधीही चेहरा दाखवणं गरजेचं असते. मला वाटतं नाही मला प्रचाराला कमी वेळ मिळाला. मी निवडणुकीकडे निवडणुकीसारखं पाहते. शिवसेना आम्ही आहोत. समोर काय त्याच्याशी बोलण्याची गरज नाही. असे यामिनी जाधव म्हणाल्या.