क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे
Admin

क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे

क्रीडामंत्र्यांच्या आश्वासनानंतर कुस्तीपटूंचा संप मागे
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) आणि अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्यावर लैगिंक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. बृजभूषण सिंग यांच्या कारभाराविरोधात विनेश फोगट, अंशू मलिक, बजरंग पुनिया, साक्षी मलिकसह भारताचे कुस्तीपटू दिल्लीच्या जंतर-मंतरवर आंदोलनाला बसले आहेत. या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

आपल्या पदाचा गैरवापर करुन ते खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत. असे तिने सांगितले. दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचा निषेध करत आहेत. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू या आंदोलनात सहभागी झाले आहेत. कुस्तीपटू बबिता फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि इतर अनेक कुस्तीपटूही क्रीडामंत्र्यांसोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही, फक्त आश्वासनं मिळाली आहेत. महासंघाच्या प्रमुखांना पदावरुन हटवून तुरुंगात पाठवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. असे विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी सांगितलं होते.

कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात एल्गार पुकारत आंदोलन केलं होतं. त्यामुळे सर्वात आधी प्रशासनाकडून त्यांना अध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं आहे. विनेश फोगट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि रवी दहिया यांच्यासह इतर कुस्तीपटूंनी केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी झालेल्या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत चौकशीचं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला.

बैठकीनंतर कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाले, "क्रीडामंत्र्यांनी आमच्या मागण्या ऐकल्या आणि योग्य तपासाचं आश्वासन दिलं. मी त्यांचे आभार मानतो आणि आम्हाला आशा आहे की, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होईल, म्हणून आम्ही सध्या आंदोलन मागे घेत आहोत." असे ते म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com