'अक्षता म्हात्रेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या' या मागणीसाठी महिलांचा मोर्चा
कोपरखैरणे येथे मोर्चामध्ये महिलांसह पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. कोपरखैरणे तीन टाकी ते वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मोर्चा जाणार आहे. मोर्च्यात नवी मुंबई शहरातील नागरिक देखील सहभागी झाले आहेत.
कल्याण शिळफाटा येथे मंदिरात गेलेल्या अक्षता म्हात्रे या विवाहितेवर तीन पुजाऱ्यानी शारीरिक अत्याचार करून निर्दयी हत्या केली होती. बेलापूर येथील सासर आणि कोपरखैरणे येथे माहेर असणाऱ्या या दुर्दैवी महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी आज हा मोर्चा काढण्यात आला आहे. शिलघर पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या आरोपींना फाशी द्यावी या मागणीसाठी संतप्त भावना आहेत.
नराधमांना नुसती अटक नको त्यांना कठोर शिक्षा करून फाशी द्या आमच्या ताईला न्याय हवा आहे अशी मागणी करत नवी मुंबई शहरातील कोपरखैरणे येथून वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक दिशेने मोर्चा निघाला आहे. या मोर्चामध्ये असंख्य नवी मुंबई शहरातील नागरिक महिला सहभागी झाल्या असून आरोपीला कठोर शिक्षा करून फाशीची द्या अशी मागणी करण्यात येत आहे.