महिला आशिया चषकाला आजपासून सुरूवात

महिला आशिया चषकाला आजपासून सुरूवात

महिला आशिया चषक आजपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील सात संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची माहिती आयसीसीनं दिली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

महिला आशिया चषक आजपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील सात संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची माहिती आयसीसीनं दिली आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यासह बहुतेक देशांनी आपपल्या संघाची घोषणा केलीय. ही स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात 1 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, 15 ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

आगामी महिला आशिया चषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाची धुरा संभाळणार आहे. तर, स्मृती मानधनाच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी असेल. याशिवाय, रिचा घोषची भारताच्या संघात विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आलीय. दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांच्यासह जेमिमा रोड्रिग्ज आणि सबिनेनी मेघना यांनाही संधी देण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, यास्तिका भाटियाला या स्पर्धेत भारतीय संघात जागा मिळाली नाही. आत्तापर्यंत महिला टीमने सहावेळा आशिया चषक जिंकला आहे. यंदाचा आशिया चषक सुद्धा टीम इंडिया जिंकेल असा दावा अनेक माजी खेळाडूंनी केला आहे. कारण नुकत्याच झालेल्या स्पर्धेत टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकली. विशेष म्हणजे झालेल्या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला एकही सामना जिंकू दिला नाही.

या स्पर्धेत छोट्या संघांचा समावेश केल्यास तेथील क्रिकेटला चालना देण्यासाठी फायदा होईल. सहयोगी संघांना या स्पर्धेत खेळण्याची उत्तम संधी आहे. काही निवडक संघच विजेतेपदाचे दावेदार आहेत. येथे आम्ही सातही संघांचे पथक देत आहोत. असे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले.

महिला टीम इंडिया

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, शफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, एस मेघना, स्नेह राणा, डी हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव, किरण नवगिर

महिला टीम श्रीलंका

चमारी अथापथु (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहरी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी (डब्ल्यूके), कौशिनी नुथ्यांगा, ओशाधी रणसिंघे, मलशा शेहानी, मधुशिका मेत्थानंद, इनोका रणवीरा, रश्मी सिल्वा, सुधिगन कुमारी, सुधिका कुमारी, कौशिनी. कुलगीना कुमारी, थारिका शेवंडी

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com