पाणी टंचाईविरोधात भरपावसात महिलांचा केडीएमसीवर हंडा-कळशी मोर्चा

पाणी टंचाईविरोधात भरपावसात महिलांचा केडीएमसीवर हंडा-कळशी मोर्चा

Water scarcity : भाजपच्या माजी उपमहापौर देखील हंडा कळशी घेत मोर्चात सहभागी
Published on

अमझद खान | कल्याण : टिटवाळ्यात पाणीटंचाई (Water Scarcity) विरोधात भर पावसात भाजपच्या नेतृत्वाखाली महिलांचा कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर (Kalyan-Dombivli Municipal Corporation) हंडा कळशी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपच्या (BJP) माजी उपमहापौर देखील सहभागी होत्या. यावेळी पाणी समस्या तात्काळ सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पालिकेला देण्यात आला.

पाणी टंचाईविरोधात भरपावसात महिलांचा केडीएमसीवर हंडा-कळशी मोर्चा
Vidhan Parishad Election : महाविकास आघाडीची विकेट पडणार

कल्याण जवळ असलेल्या टिटवाळा मांडा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिक पाणी टंचाईमुळे त्रस्त आहेत. कमी दाबाने व अपुरा होणारा पाणी पुरवठा यामुळे नागरिकांमध्ये संतापचे वातावरण आहे. याबाबत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकडे अनेकदा तक्रारी केल्या, आंदोलने केली. मात्र, अद्याप पाणी समस्या सुटलेली नाही. परंतु, आता पाणी समस्येबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज भाजपच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलानी हंडा कळशी डोक्यावर घेत निमकर नाका ते पालिका कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. या मोर्चात भाजपच्या माजी उपमहापौर उपेक्षा भोईर या डोक्यावर हंडा कळशी घेत सहभागी झाल्या होत्या. भर पावसात हा मोर्चा निघाला होता. या मोर्चा दरम्यान महिलांनी प्रशासनाविरोधात निषेध नोंदवत घोषणाबाजी केली. पाणी समस्या तात्काळ सोडवा अन्यथा आणखी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी पालिकेला देण्यात आला.

पाणी टंचाईविरोधात भरपावसात महिलांचा केडीएमसीवर हंडा-कळशी मोर्चा
Monsoon Update : राज्यातील 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा यलो अलर्ट
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com