Free Silai Machine Scheme | Central Government
Free Silai Machine Scheme | Central Governmentteam lokshahi

Free Silai Machine Scheme : मोदी सरकार देतय मोफत शिलाई मशीन, आजच करा अर्ज

शिलाई मशीन मोफत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्र जाणून घ्या
Published by :
Shubham Tate
Published on

Apply For Free Silai Machine Yojana 2022 : देशातील महिलांना आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि स्वावलंबी बनवण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यापैकी एक म्हणजे मोफत शिलाई मशीन योजना (Free Silai Machine Yojana 2022) सरकार महिलांना मोफत शिलाई मशीन देत आहे. (women how to get free sewing machine from government know online apply details)

या योजनेच्या मदतीने महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी इतर कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही याची काळजी घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यांच्या प्रत्येक गरजा स्वतःहून पूर्ण करण्यासाठी ते सक्षम असले पाहिजेत. या उद्देशाच्या पूर्ततेसाठी शासनाकडून महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात येत आहे.

Free Silai Machine Scheme | Central Government
मुसळधार पावसाचा हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील गावांना फटका, मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

विनामुल्य

या योजनेसाठी पात्र असलेली महिला अर्ज करून शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊ शकते. देशातील सर्व राज्यांसाठी केंद्र सरकारचा आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रत्येक राज्यातील 50 हजार महिलांना मोफत शिलाई मशीन दिली जात असून त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

या वयातील महिला अर्ज करू शकतात

20 ते 40 वयोगटातील महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात आणि सहज शिलाई मशीन मोफत मिळवू शकतात आणि स्वतःचा रोजगार सुरू करू शकतात. हरियाणा, गुजरात, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना सुरू आहे. या राज्यांतील महिला या योजनेचा लाभ घेऊन आपला रोजगार सुरू करू शकतात. त्यासाठी त्यांना अर्ज करावा लागेल.

ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा

ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ मिळणार आहे. महिलाही यासाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर एखाद्याला या योजनेंतर्गत अर्ज करायचा असेल, तर त्याला प्रथम www.india.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

Free Silai Machine Scheme | Central Government
बॉलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्याचे 'सून'सोबत अफेअर, बलात्काराचा आरोप

अधिकारी तपास करतात

लिंकवरील अर्जाच्या PDF ची प्रिंट काढा. त्यानंतर अर्ज भरा आणि फॉर्मसोबत आवश्यक कागदपत्रे जोडा. त्यानंतर संबंधित कार्यालयात फॉर्म जमा करा. अधिकारी तुमच्या अर्जाची छाननी करतील. अर्जात दिलेली माहिती बरोबर आढळल्यास, तुम्हाला शिलाई मशीन मोफत दिले जाईल.

शिलाई मशीन मोफत मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड

जन्मतारीख प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

या योजनेसाठी कोण पात्र आहे

अर्जदार भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे

देशातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलाच या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक उत्पन्न 12 हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

विधवा आणि दिव्यांग महिला देखील या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात आणि लाभ घेऊ शकतात.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com