Crime
Crime Team Lokshahi

धक्कादायक! डाकीण असल्याच्या संशयातून महिलेला विवस्त्र करुन मारहाण

महिलेला चटके देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे.
Published by :
Sudhir Kakde
Published on

नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यात एक चीड आणणारी घटना घडली आहे. डाकीण असल्याच्या संशयावरुन महिलेला विवस्त्र करुन मारहाण (Molestation) झाल्याची घटना समोर आली आहे. विवस्त्र करुन या महिलेस चटके देण्याचेही प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे. समाजातील काही दुष्टप्रवृत्तींकडून महिलेला विवस्त्र केल्याचे व्हिडीओ सोशल मिडीयावरही व्हायरल करण्यात आले.

नंदुरबारमध्ये घडलेली ही घटना नेमकी कुठल्या गावात घडली हे अजून समोर येऊ शकलेलं नाही. अंधश्रद्धा निर्मुलन समिती आणि पोलिसांकडून यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Crime
राज ठाकरेंनी पत्रकार परीषदेत केल्या 2 मोठ्या घोषणा

दरम्यान, 14 एप्रिलपासून हा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत असून, व्हिडीओतील बोलीभाषा ही सातपुडा परिसरातील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com