आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ सर्व 'ठाकरे सेना' आज नागपुरात; अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार?

आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ सर्व 'ठाकरे सेना' आज नागपुरात; अधिवेशनाचा दुसरा आठवडा वादळी ठरणार?

आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. हा दुसरा आठवडा वादळी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

आज अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरु होत आहे. हा दुसरा आठवडा वादळी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. संजय राऊत यांनी काल नवी मुंबईतील सभेतून शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, नागपुरात बॉम्ब फोडणार. त्यामुळे आता आज नागपुरात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नागपूरमध्ये उध्दव ठाकरे आणि मी बरेच बॅाम्ब फोडणार आहोत. आम्ही पाठीत खंजीर खुपसणारे नाही, धमक्या द्या , तडीपारी करा तरीही आमची सेना बुलंद आहे. फेब्रुवारीपर्यंत काहीही करून घ्या. नंतर तुम्ही नसणार. अली बाबा चाळीस चोर फेब्रुवारीनंतर नसणार. आम्ही बलिदान दिले. रक्त सांडले.तुम्ही काय केले टेंडर काढली, भूखंड खाल्ले. 40 आमदार गेले असले तरी आता 140 आमदार निवडून आणून आपला मुख्यमंत्री बनवायचा आहे. ज्यांनी आपल्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना सोडायचे नाही. तुमचे शंभर बाप आले तरी तुम्हाला सोडणार नाही. ज्या कोठडीत मी होतो. त्यात तुम्हाला टाकणार. तुम्ही मागून खंजीर खुपसला, आम्ही पुढून खुपसू असा जोरदार हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर आज नागपुरात आहेत. यामुळं अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरणार आहे. ठाकरे गटाची फौज नागपुरात दाखल झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com