ताज्या बातम्या
रेपो दर वाढणार की कमी होणार? आज होणार निर्णय
आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास रेपो दराची घोषणा करणार आहेत.
आज रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास रेपो दराची घोषणा करणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरींग कमीटीची बैठक सुरु आहे. या बैठकीत झालेला निर्णय आज ते जाहीर करतील. रेपो दर वाढणार की कमी होणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
गृहकर्ज, वाहनकर्ज, वैयक्तिक कर्ज यांचे व्याजदर वाढणार, मुदत ठेवींवरील व्याजदर वाढू शकतात.गेल्या वर्षी मे महिन्यापासून रेपो दर वाढण्यास सुरूवात झाली.सुरूवातीला यात २.२५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यानंतर सलग ५ वेळा रेपो दर वाढवण्यात आलेत. सध्या ६.२५ इतका रेपो दर आहे.
महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आरबीआय व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सने वाढ होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून देशातील इतर बँका कर्ज घेत असतात. रेपो रेट वाढवला म्हणजे त्या बँकांनी घेतलेल्या कर्जाचा व्याज दर वाढवला.