सणासुदीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट

सणासुदीत पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार? आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट

सध्या कच्च्या तेलाच्या किमती खूप खाली गेल्या आहेत. अशा स्थितीत लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होऊ शकते. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

सध्या कच्च्या तेलाच्या किमती खूप खाली गेल्या आहेत. अशा स्थितीत लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होऊ शकते. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या सुरू असलेल्या विक्रीतून भारताला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत यंदा सणासुदीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 2 ते 3 रुपयांनी घट होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. फिलहास ब्रेंट क्रूड देखील प्रति बॅरल $ 92 च्या खाली व्यवहार करत आहे. आज दुसऱ्या दिवसाच्या घसरणीत क्रूड जवळपास 5 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

कच्च्या तेलाच्या किंमती 8 फेब्रुवारीनंतर पहिल्यांदाच 90 डॉलर प्रति बॅरल खाली उतरल्या आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. 5 सप्टेंबर रोजी ओपेककडून मागणीत होत असलेली घट आणि जागतिक बाजारातील मंदीच्या सावटाच्या भीतीनं ऑक्टोबरपासून उत्पादन 1 लाख बॅरल प्रति दिवस कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

देशातील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर देशातील राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई 106.25 94.22

पुणे 105 92

नागपूर 106.03 92.58

नाशिक 106.74 93.23

हिंगोली 107.29 93.80

परभणी 108.92 95.30

धुळे 106.05 92.58

नांदेड 108.24 94.71

रायगड 105.96 92.47

अकोला 106.05 92.55

वर्धा 106.56 93.10

नंदुरबार 106.99 93.45

वाशिम 106. 37 93.37

चंद्रपूर 106.14 92.70

सांगली 105.96 92.54

जालना 107.76 94.22

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com