अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पूजन
Team Lokshahi

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पूजन

Vat Purnima : १२ वर्षापासून समाज परिवर्तनाची लढाई कायम
Published on

अमोल नांदूरकर | अकोला : समाजातील अनिष्ठ रुढी परंपरांना झुगारत स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या महिलांनी मंगळवारी वट पौर्णिमा (Vat Purnima) साजरी करीत पूजन केले. १२ वर्षापासून समाज परिवर्तनाची लढाई कायम असल्याचे दिसत आहे.

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पूजन
उद्धव ठाकरेंच्या गाडीतून आदित्य ठाकरेंना उतरवले, कारण...

प्रथमतः घरातून आणि समाजातून विधवांना अनेक बंधनांना आजही सामोरे जावे लागते. विधवांना वटपौर्णिमा पूजन समाजाने अमान्य असल्याने विधवा महिला वट पूजनासाठी पुढाकार घेत नाहीत किंवा त्यांना घेऊ दिला जात नाही. अशा गंभीर परिस्थितीतही वीरस्त्री स्व. लताताई देशमुख प्रेरीत स्वामिनी विधवा विकास मंडळ प्रवाहाविरुद्ध लढा देत गत बारा वर्षापासून विधवा वट पौर्णिमा पूजन करत आहे.

विधवा सन्मानार्थ झालेल्या वट पूजनाकरिता स्वामिनीच्या सचिव सुनिता डाबेराव व जिल्हाध्यक्षा साधना पाटील यांच्या नेतृत्वात रेखा नकासकर, कविता तायडे, शिला इवरकर, मीरा वानखडे, सुनिता टाले पाटिल, चेतना गोहेल, स्मिता जंगले, शोभा काहाळे, जयश्री गायकवाड, वर्षा गावंडे, आरती देशमुख, दीपाली देशपांडे, सपना ताथोड या महिलांनी पुढाकार घेत वटपौर्णिमा पूजन करुन विधवांना शुभेच्छा दिल्या.

अनिष्ठ परंपरा झुगारत स्वामिनीच्या विधवांनी केले वटपौर्णिमा पूजन
फडणवीसांना भाषणाची संधी, अजित पवारांना नाही; PM मोदींनी डावलले?

चौकटबद्ध समाजातून प्रतिसाद नसतांना सुद्धा अनिष्ठ सामाजिक बंधनांना झुगारुन स्वामिनी संघटना करीत असलेल्या समाज सुधारणे याबाबत उपस्थित महिलांनी भरभरुन कौतुक केले. हा स्वामिनी पॅटर्न राज्यभर राबवून याला कायदेशीर मान्यता मिळाल्यास विधवा महिलांवरील सामाजिक दडपण दूर होईल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक यांनी व्यक्त केला. यावेळी विधवांनी आपले मनोगत व्यक्त करुन स्वामिनी संघटनेने समाजाकडे लक्ष न देता परंपरा कायम ठेवावी आणि शासनाकडे पाठपुरावा करावा असा आग्रह धरला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com